शनिवार, २२ डिसेंबर, २०१२

पुरंदरचा तह !!! एक प्रोत्साहित करणारी कथा..


दिसायला मोठ आहे...पण मराठी तरुण असाल तर वाचाच जरूर !"


एक बारावितला मुलगा होता, वय असेल किमान १७ - १८ वर्ष. याच वयात खरतरं
मूल यशाकडे दृष्ठी रोखून असतं आणि याच वयात मुलाच पावूल वाईट रस्त्यावर
हि पडू शकत. त्याला संस्कारच पाणी याच वयात मिळत.

मित्रांनो खरच आयुष्यातला महत्वाचा काळ कुठला असेल तर हाच......१६ ते २५
मधला काळ. असाच एक मुलगा होता................... स्वभावाने हे मूल फार
चंचल,हसतमुख...............पण जेव्हापासून त्याची बारावीची परीक्षा सुरु
व्हायला केवळ एक आठवडा राहिला तेव्हापासून तो खचत चालला, त्याला टेन्शन
येवू लागल ...................मग त्याच्या आईलाही कळाल कि आपला मुलगा रोज
असतो तसा नाहीये.................आईने मुलाच मन ओळखल आणि आई म्हणाली,"काय
झाल रे बाळा! कालपासून बघतेय तू कसलातरी सारखा विचार करत
असतो.........काय झाल मला सांग ना?". मुलाने भरल्या छातीने
सांगितलं,"आई............. परीक्षा!", एवढंच म्हणून ते मूल घराबाहेर गेल,
रोज मित्रात रमणार हा मुलगा जेव्हा नाक्यावर गेला तेव्हा त्याचा
मित्रापासून दूरू जावून बसला आणि विचार करू लागला. परत तिथून उठून असाच
चालू लागला...........चालता चालता कुठे आलोय याची त्याला सुद्धा जाणीव
नव्हती.........तो फक्त त्याच्या विचारात होता .............मगत्याला
रस्त्याच्या कडेला एक विहीर दिसली, त्या विहारीकडे बघू
लागला.........चालत चालत त्या विहारीकडे गेला. त्याच रस्त्याच्या एका
कडेला विहीर होती तर दुसरया कडेला छत्रपती शिवाजी महाराज्यांचा यांचा
पुतळा होता..............................मूल आता त्या विहिरीत उडी
मारण्याच्या विचारात होत......................आता मारणार
.........मारणार.......उडी मारणार ...................पण उडी माराताक्षणी
एक नजर त्या पुतळ्याकडे गेली ! आणि .............आणि...........तो
थांबला..........तसाच स्तब्ध !
आता त्याच्या मनात चांगले विचार येवू लागले............ ते मूल पळत पळत
घरात शिरलं.........दाराचा धाड दिशी आवाज झाला. आई काय झाल म्हणून बाहेर
आली, आई ने बघितलं कि तिचा मुलगा काहीतरी शोधतोय आई ने विचारलं, "काय झाल
बाळा,काय शोधतोय?" मुलाच्या चेहऱ्या वर आनंद पाहून आई खुश झाली. परत तिने
विचारलं."काय पाहिजे मला सांग मी शोधून देते.".......मुलगा आई ला
म्हणाला,"आई,माझी जुनी पुस्तकांची बॅग कुठे आहे? " आई
म्हणाली,"पोटमाळ्यावर,का रे ?" मुलाने लगेच पोटमाळ्यावरून बॅग काढली. आई
ते सगळ कुतूहलाने बघत होती. मुलाने बॅगेत हात घातला पटापटा पुस्तक काढू
लागला...........सगळी पुस्तक फरशीवर पसरली होती..................त्याला
त्याच पाहिजे असलेल पुस्तक मिळत नव्हत............अचानक त्याची नजर
फरशीवर पडलेल्या पुस्तकावर पडली..............पुस्तकाचा कवर ओळखीचा
वाटला............मुलाने हळूच ते पुस्तक हातात घेतलं आणि "Yes! हेच" अस
म्हणून लगेच गच्चीवर ते पुस्तक घेउन गेला.आई ला काही कळाल नाही, आई विचार
करत होती, हा मघाशी टेन्शन मध्ये होता लगेच याला काय झाल! आई त्याच्या
मागे गेली.........तिला दिसलं कि मुलगा कसलंतरी पुस्तक हातात घेवून
वाचतोय...................कुठल आहे ते पुस्तक.......कुठल..........कुठल ?
मग तिची नजर पुस्तकाच्या कवर वर गेली ...........तीन पाहिलं कि त्या
पुस्तकावर शिवाजी महाराजांचा घोड्यावर बसून फोटो आहे. आईने मुलगा वाचन
करतोय म्हणून कुठलाही व्यत्यय न आणता निघून गेली. त्या मुलाच्या हातात
होत ते पुस्तक कि जे त्यांनी सातवीच्या वर्गा मध्ये वाचल
होत............तो वाचत होता प्रकरण "पुरंदरचा तह" ओळी अशा होत्या कि "इ.
स. १६४९ मध्ये आदिलशहाने शहाजीराजांना कैदेत टाकले. याच वेळी शिवाजी
महाराजांनी अनेक आदिलशाही किल्ले आपल्या ताब्यात घेतले. म्हणून
शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने फत्तेखानास रवाना केले.
परिस्थिती फारच बिकट होती. एकीकडे आपले वडील कैदेत होते तर दुसरीकडे
फत्तेखानाच्या स्वारीमूळे स्वराज्या धोक्यात येणार होते. महाराजांनी
यावेळी लढाईसाठी पुरंदर किल्ल्याची जागा निवडली. या पुरंदर किल्ल्याच्या
सहाय्याने मराठ्यांनी फत्तेखानाशी झुंज दिली आणि लढाई जिंकली. शिवाजी
महाराजांना या पहिल्या लढाईतच मोठे यश प्राप्त झाले. सन १६५५ मध्ये
शिवाजीराजांनी नेताजी पालकर यास गडाचा सरनौबत नेमले. वैशाख शु. १२ शके
१५७९ म्हणजेच १६ मे १६५७ गुरुवार या दिवशी संभाजी राजांचा जन्म पुरंदरावर
झाला.शके १५८७ म्हणजेच १६६५ मध्ये मोगल सरदार जयसिंगाने पुरंदारला वेढा
घातला.खानाने वज्रगड ताब्यात घेतला आणि पुरंदरावर हल्ला केला व पुरंदर
माचीचा ताबा घेतला. माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध झाले.
मुरारबाजी पडला आणि त्याच बरोबर पुरंदरही पडला. हे वर्तमान जेव्हा
राजांना कळले तेव्हा त्यांनी जयसिंगाशी तहाचे बोलणे सुरू केले आणि ११ जून
१६६५ साली इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह झाला.यात २३ किल्ले राजांना
मोगलांना द्यावे लागले. कालांतरे त्यांनी परत एका मागे एक किल्ले परत
मिळवले,त्याच्यावर एका सुलतानाचा वाक्य आहे कि "ये शिवाजी आदमी है या कोई
जादुगार कैसे ? कैसे ?............जीत सकता है ये किल्ले..........कैसे
लढकर जीत जाता है ये चार बडे शाहीसे
(मुघलशाही,आदिलशाही,कुतुबशाही,सुलतानशाही)."
हे सगळ मुलगा एकाग्रतेने वाचत होता..........नंतर मुलाने जो बोध घ्यायचा
तो घेतला तो मनात म्हणाला, "अरे राजांनी एवढा मोठ संकट दूर
केल........... नंतर परत हे २३ किल्ले मिळवले ! मी एक मराठा आहे हे मी
विसरलोच होतो, शिवाजींचा मी एक मावळा आहे हे मी विसरलो
होतो....................मग माझ्या मनात आत्महत्येचा विचार कसा काय
आला....................अरे शिवाजी महाराजांनी एवढं मोठ संकट गिळून
त्याचावर मात करून यश मिळवलं..............त्यांच्या आयुष्यात अनेक संकट
आली त्यांनी कधी केला का आत्महत्येचा विचार . माझ्या समोर तर काही संकट
नाही फक्त आहे ती माझी बारावीची परीक्षा..............हे !...शे!..
शे!...............मी आता कधी हार मानणाराच नाही.................आता
बारावीची परीक्षा काय जीवनाच्या या परीक्षेत मी नक्कीच पास
होणारच....................कारणमाझ्या कडे शिवराय नावच टोनिक आहे. "
त्या दिवशी पासून मुलगा अभ्यासाला लागला इतका अभ्यास करू लागला कि
दिवसातून फक्त ३ तास झोपू लागला...................आई-वडिलांना आश्चर्य
वाटले!.................मुलाने वर्षभराचा अभ्यास जेम-तेम ७ दिवसांत
कष्टाने पूर्ण केला................. कष्टाने फळ दिल....... निकाल
लागला.........मुलगा १२ वी ला वर्गातून पहिला आला... आईला अतिशय आनंद
झाला आईला कळून चुकल त्या दिवशी मुलगा काय वाचत होता..........वर्गातील
त्याच्या मित्रांना आणि शिक्षकांना आश्चर्य वाटले कि सतत परीक्षेला
भिणारा काट्यावर पास होणाऱ्या मुलाने एवढी प्रगती कशी केली ........ हाच
प्रश्न पडलेल्या त्याच्याच वर्गातील एका हुशार मुलाने ( कि जो वर्गात
नेहमी पहिला येत होता..त्याने) त्याला विचारलं,"का रे कस काय जमल तुला."
त्याने फक्त दोनच वाक्यच उत्तर दिल " पुरंदरचा तह !!!

जर अस्सल मराठी असाल तरच लाईक करा......

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा